Re-Totaling / गुणांची पडताळणी
Instructions
१. फक्त नोंदणीकृत व आयोगाने परवानगी दिलेल्या परीक्षेच्या उमेदवारांनाच गुणांच्या पडताळणीसाठी अर्ज करता येईल.
२. पूर्व परीक्षा अथवा चाळणी परीक्षेकरिता उत्तरपत्रिकांची / उत्तरपुस्तिकांची गुण-पडताळणी अथवा फेरतपासणी केली जात नाही.
३. पारंपरिक पद्धतीच्या परीक्षा / उत्तरपुस्तिकेकरिता गुणांची पडताळणी करण्यात येते. फेरमुल्यांकन केले जात नाही.
४. परीक्षा–योजनेनुसार संबंधित परीक्षेच्या निकालानंतर गुणपत्रिका निर्गमित केल्यावर आयोगाने गुणांच्या पडताळणीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत आयोगाने गुणांच्या पडताळणीकरिता परवानगी दिलेल्या परीक्षांच्या बाबतीत, संबंधित उमेदवारांना गुणांच्या पडताळणीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. .
५. गुणांच्या पडताळणीकरिता उमेदवाराने स्वतःच्या User ID व Password द्वारे प्रवेश (Login) केल्यानंतर संबंधित विषयांची निवड करावी, संबंधित विषयांची निवड केल्यानंतर Submit to MPSC या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर Print या बटनावर क्लिक करुन चलनाची प्रत घ्यावी.
६.प्रत्येक विषयाकरिता रुपये ११०/- याप्रमाणे शुल्क विहित चलनाद्वारे रोखीने भारतीय स्टेट बॅंकेमध्ये आयोगाने विहित केलेल्या कालावधीत भरावे..
७. . भारतीय स्टेट बॅंकेमध्ये रक्कम भरल्यानंतर बॅंकेकडून चलनावर प्राप्त झालेला Transaction ID व दिनांक विहित कालावधीत ऑनलाईनच्या प्रोफाईलमध्ये नोंदवावा. त्याशिवाय गुणांच्या पडताळणीची विनंती विचारात घेतली जाणार नाही.
८. विहित पद्धतीने पडताळणीसाठी अर्ज करणे, बँकेमध्ये विहित परीक्षा शुल्काचा भरणा करणे, तसेच बँकेकडून प्राप्त होणारा Transaction ID विहित कालावधीत नोंदविणे, याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची आहे. विहित कालावधीनंतर संबंधित वेबलिंक आपोआप बंद होतील.
९.गुणांच्या पडताळणीबाबत आयोगाचा निर्णय संबंधित उमेदवाराला ई-मेलद्वारे, तसेच एस.एम.एस.द्वारे कळविण्यात येईल.
१०. गुणांच्या पडताळणीसाठी ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीत केलेल्या विनंतीचा विचार करण्यात येईल. इतर कोणत्याही पद्धतीने केलेल्या अभिवेदनांचा, अथवा विनंतीचा विचार केला जाणार नाही.

Sr No Name of the Post/Examination Advt. No. Last Date Apply

1 Assistant Main Competitive Exam 2012 302-2012 23-05-2013
Amount Submission Last Date in Bank:24-05-2013
Transaction ID Updation Last Date:27-05-2013

2 Maharashtra Forest Service Main 260-2012 23-05-2013
Amount Submission Last Date in Bank:24-05-2013
Transaction ID Updation Last Date:27-05-2013

 



    Copyright © 2010 MPSC.All Rights Reserved